Friday, 26 August 2011

खोपोली आश्रम - ओम चैतन्य गगनगिरी महाराज आणि झीनिथ धबधबा

खोपोली आश्रम - ओम चैतन्य गगनगिरी महाराज आणि झीनिथ धबधबा     
   .................   खोपोली हे रमणीय शहर आहे. खोपोली हे कर्जत पासून पाचव्या स्थानकावर आहे. पाताळगंगा नदी ही मुख्य नदी आहे. सार्वजनीक सुट्टीच्या दिवशी व रविवारी रेल्वे  खचाकच भरून जातात. तरुण व तरुणी चा घोळका, नवतरुण युवक, कॉलेज पिकनिकस, क्लासेसेस पिकनिकस तसेच  कुटुंबासह फिरणारे सुद्धा खूप दिसतात. खोपोली रेल्वे स्टेशनला  लागूनच श्रीमंत नानासाहेब फडनीसानी (पेशवे कालीन मंदिर) बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे नामकरण श्री विरेस्श्वर मंदीर असे केले आहे. मंदिराच्या बाजूला काळ्या दगडातील मोठे पाण्याचा साठा असलेले तलाव आहे. तलावाच्या बाजूचा परिसर मोहक व रमणीय आहे. नवख्या प्रवास्यांना इथे आवर्जून सांगावसे वाटते कि हा तलाव खूप खोल आहे. तलावात उतरताना काळजी घ्यावी लागते. मंदिरात भगवान महादेवाचे लिंग असून गाभार्र्य्तील वातावरण फारच प्रस्सन वाटते. महाशिवरात्रीला येथे मोठ्या संखेने भावीक येतात.
Vireshwar Mahadev Temple- Khopoli





Nandi in front of Temple


तलाव



No comments:

Post a Comment